बारामती : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीत मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत .या विकासकामाची पाहणी स्वतःकरतात त्यामुळे काम चांगले पद्धतीने ठेकेदाराला करावे लागते यामध्ये शंका नाही.त्याच विकसित बारामतीत दलीत वस्ती आहेत त्याठिकाणी विकास कामे झाली आहेत. या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर कोणताच नेता सदर काम कशा पद्धतीने चालू आहे याकडे लक्ष देत नाहीत.त्यानंतर उद्घाटन करताना दिसतात.दलित वस्तीत केलेले रस्ते आणि इतर ठिकाणी केलेले रस्ते यामध्ये मोठा फरक दिसून येईल.तसेच कॅनॉल वर जसे पथदिवे बसविले आहेत तसे पथदिवे लोकवस्तीत का बसविण्यात आले नाहीत. सुशोभिकरण केले तर चांगलेच आहे परंतु लोकवस्तीत आज देखील पथदिव्याचे प्रश्न सुटले नाहीत.नदीवर लाखो रुपयांचे सार्वजनिक शौचालय बांधले त्याच बारामती शहरातील सार्वजनिक शौचालय स्वच्छता व डागडुजीचे प्रश्न आहे तसेच आहेत.एखाद्या सामजिक कार्यकर्ता किंवा सामान्य व्यक्तीने नगरपालिकेला अर्ज करून एखादे काम करून घेतले तर स्थानिक नेतेमंडळी कडून दबाव टाकला जातो.त्यामुळे बारामती शहरातील दलीत वस्तीत सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विकासकामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी करावी असे निवेदन जय दादा पाटील बारामती शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिले.यावेळी भारतीय युवा पँथर संघटना महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष अस्लम वस्ताद शेख, मनिष लालाबिगे आणि पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री यांनी दलीत वस्तीमधील विकास कामांची पाहणी केली तर सुरू असलेली कामे चांगल्या दर्जाची होतील.पूर्ण झालेल्या विकास कामाची देखभाल डागडुजी वेळेवर होईल.