डिजिटल च्या गतीमान जमान्यात सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसें – दिवस मोठी वाढ होऊ लागली आहे. आपण आपल्या ऑनराईड फोन चा काळजी पूर्वक वापर करा . सायबर गुन्हेगाराच्या कसल्याही अमिषाला बळी पडू नका असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने यांनी केले.
जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी , विभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते , पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या मार्गदर्शना खाली
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीची माहिती व्हावी. सायबर गुन्हेगारा कडून महाविद्यालयीन मुला मुलींची फसवणूक होऊ नये या करिता उमरगा पोलीस ठाण्या अंतर्गत ” पिंक ” पथक ,आदर्श महाविद्यालय, व टाटा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ” सावध रहा , सायबर गुन्हेगारां पासून स्वतःचा बचाव करा ” या विषया वर मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी, उपप्राचार्या संद्या सगर , प्रा.डॉ. अनुराधा मिरगणे, पोऊनि शोभा पवार , पोहेकॉ मनोज सोमवंशी यांची प्रमुख. उपस्थिती होती.
या वेळी पोऊनि अनुसया माने , प्रितम तिर्की, जमुना मुंडा यांनी सायबर गुन्हेगारी बाबत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. अली कडे सायबर गुन्हेगार विविध अँप्स व फोन द्वारे वेगवेगळी आमिषे दाखवून जनतेची फसवणूक करित आहेत. हानीट्रॅप च्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यानी भयमुक्त वातावरणात शिक्षण घेऊन आपला व्यक्तीमत्व विकास साधावा असे आवाहन माने यांनी केले. प्रास्तावीक उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी केले , प्रा.डॉ. भिमाशंकर खरोसे यांनी आभार मानले.