उदय सामंत उद्योग मंत्री यांचा धुळे जिल्हा दौरा असताना . त्यातच साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील व्यापाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीची मागणी उदय सामंत यांच्याकडे केली होती. याकरिता साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे सटाणा रोडवरील कृष्णा रिसॉर्ट येथे साक्री तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन संचालक प्रमुख कार्यकर्ते यांचा सत्काराचा कार्यक्रम साक्री तालुक्यातील आमदार मंजुळा गावित यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला
पिंपळनेर व्यापाऱ्यांना उदय सामंत यांनी सांगितले शब्द देतो येत्या सहा महिन्यात पिंपळनेरला एमआयडीसी उभी राहणारच असे आश्वासन दिले. धावत्या दौऱ्यात साक्री येथे शिंदे गटातील साक्री समर्थकांनी उदय सामंत यांना रस्त्यावर थांबवून मोठ्या संख्येत उपस्थित राहून स्वागत करण्यात आले. स्वागत करताना रावसाहेब गिरासे. अनिल बागुल. सुमित नागरे. अशोकगिरी महाराज. गोटू जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते…