चांदुर बाजार तसेच अचलपूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध वाळू वाहतूक वर महसूल विभागाच्या काही निवडक अधिकारी यांच्या मुळे दुर्लक्ष होत आहे.त्यावर महसूल विभागाने कारवाई करणे आवश्यक असताना जाणीवपूर्वक त्या कडे होत असलेल्या दुर्लक्षित कारभार मुळे शासनाचा महसूल बुडत आहे तर अधिकारी यांचा महसूल वाढत आहे.
अचलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील : RS फ्रुट कंपनीसमोर चांदूरबाजार नाका चौक ते अचलपूर कडे जाणारे रोडवर दिनांक 31 ला स्थानिक गुन्हे शाखेच्या चे पथक अचलपूर डिव्हिजन मध्ये गणेशोत्सव बंदोबस्त पेट्रोलिंग करत असताना पथकास मिळालेल्या गोपनीय अवैद्यरित्या, विनापरवाना रेती चोरून वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर सह.
1)मतीन खान हुसेन खान वय 30 रा. ( ट्रॅक्टर मालक ) *(फरार)*
2) सुरेश तुळशीराम फिसके वय 40 वर्ष ( चालक )
3) शेख वसीम शेख कलिम वय 23 वर्ष (मजूर)
तिन्ही रा. अचलपूर ता.अचलपूर जि. अमरावती.यांच्यावर गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.या कारवाई मध्ये 1) एक FARMTRAC 45 कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली सह कीं.अं. 5,00,000/-₹
2) एक ब्रास रेती कीं. 6000/-₹ चा
5,06,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला.