बारामती येथील काँग्रेसचे बारामती शहरी युवक अध्यक्ष योगेश महाडिक सह कार्यकर्ते काँग्रेसला राम राम ठोकून शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचे आम्हाला सांगितले.
योगेश महाडिक यांनी पक्षाचे तन मन व धनाने काम केले.पक्षाच्या प्रत्येक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन कामे केली. वैद्यकीय क्षेत्रात मदतीसाठी योगेश महाडिक यांनी संजय जगताप यांचे पी.ए यांना संपर्क साधला असता कोणतीही मदत झाली नाही. सार्वजनिक क्षेत्रातील कार्याला जर मदत मिळत नसेल तर वैयक्तिक स्वरूपात कधी मदत मिळणार असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे लवकरच शिंदे गटाचे नेते अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश महाडिक सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचेही योगेश महाडिक यांनी बोलताना सांगितले