हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार पोलीस चौकी अंतर्गत ब्राह्मणगाव परिसरातील वाळू घाट परिसरातून बेकायदा वाळू चोरून नेणारे ट्रॅक्टर पोलिसांनी घेतले ताब्यात यावेळी पाच लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कार्यवाही मंगळवारी सकाळी केली असून वाळूघाटावर दिवस रात्र उपसा सुरूच असून पोलीस व महसूल प्रशासनास वाळू उपसा रोखण्यास अपयश येत आहे 24 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान हट्टा पोलीस स्टेशन अंतर्गत ब्राह्मणगाव वाळूघाट परिसरात वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक एम एच 22/ ६६०७ हे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या पथकाने ताब्यात घेऊन हट्टा पोलीस स्टेशन मध्ये ट्रॅक्टर लावले असून त्यांची अंदाजे किंमत रक्कम पाच लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हट्टा पोलीस ठाण्यात वैभव बोबडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने बोरी सावंत फाट्यावर डेरा टाकला असून पथक गस्तीवर ठेवले आहे परंतु वाळू उपसा सुरूच आहे.
हट्टा पोलीस स्टेशन अंतर्गत चालू असलेला अवैद्य वाळू उपसा हा पोलीस प्रशासनाच्या व महसूल विभागाच्या आशीर्वादाने चालतो असेही जवळा परिसरात चर्चा होत आहे.