शेतकरी निर्मला नानासाहेब गुंड यांना कधी न्याय मिळणार ?
खरेदी खताचा स्वतःच्या मालकीचा रस्ता असतानाही आढवनूक केले जाते.रुढी परंपरेनुसार चालत आलेला वहिवाटीचा रस्ता रवींद्र ज्ञानदेव गुंड व राजेंद्र ज्ञानदेव गुंड व इतर बांधकरी मिळून स्वतःच्या स्वार्थासाठी रस्ता बंद करून शेतकरी निर्मला गुंड यांच्यावर अन्याय करून त्यांना शेती करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
महिलांनी शेती करायचीच नाही का?
स्वतःच्या क्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी व इतर पीक घेण्यासाठी बांधकरी करतोय महिला शेतकरी निर्मला नानासाहेब गुंड यांच्यावर अन्याय.जिल्हाधिकारी,प्रांत अधिकारी, तहसीलदार यांचे रस्ता देण्याचे आदेश असतानाही रवींद्र ज्ञानदेव गुंड व राजेंद्र ज्ञानदेव गुंड व इतर बांधकारी महिला शेतकरी निर्मला नानासाहेब गुंड यांना जमीन पडीक पाडून विकावी या हेतूने त्रास देत या महिलेवर गेल्या अनेक वर्षापासून अन्याय करत आहे.जमीन पडीक पाडून विकत द्यावी हा हेतू मनात धरून रवींद्र ज्ञानदेव गुंड व राजेंद्र ज्ञानदेव गुंड व इतर बांधकरी बळाचा वापर करून शेतात ऊस-पिक तोडणीसाठी ऊसतोड मजुरांना किंवा शेतीची मशागत करण्यासाठी येणाऱ्या कामगारांना दमदाटी करत काम बंद पाडणे ,रस्त्यावर पाणी सोडणे व शेतकरी महिलेला शिवीगाळी करत जीवे मारण्याची धमकी देत. व मारहाणही केली जाते. असा शेतकरी निर्मला नानासाहेब गुंड यांनी गंभीर आरोप केला आहे.
तरी तात्काळ न्याय मिळावा म्हणून हवालदित झालेल्या.महिला शेतकरी निर्मला नानासाहेब गुंड यांनी खूप धडपड केली. जिल्हाधिकारी,प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी देखील शेती रस्ता मिळावा म्हणून निर्मला नानासाहेब गुंड यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे. तरी देखील न्याय मिळाला नाही. पोलीस प्रशासनाकडे ही मदत मागितली पण सारे व्यर्थ:
अखेर शेतातील ऊस डोळ्यासमक्ष वाळत चाललेला पाहून व ऊसतोड मजूर भीतीपोटी येत नसल्याचे पाहून हातबल झालेल्या महिला शेतकऱ्यांने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष पुणे जिल्हा व दौंड तालुका पदाधिकाऱ्यांना अन्यायाचा पाढा वाचून दाखवला व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष या पदाधिकाऱ्यांनी अखेर शेतातील ऊस काढण्यास निर्मला नानासाहेब गुंड या शेतकरी महिलेला मदत केली.
पण आता पत्रकारांशी बोलताना निर्मला नानासाहेब गुंड यांनी सांगितले की असेच किती दिवस अन्याय सहन करायचा बांधकरी रवींद्र ज्ञानदेव गुंड व राजेंद्र ज्ञानदेव गुंड व इतर बांधकारी यांना प्रशासन जाणीवपूर्वक आर्थिक हित साधून मदत करत आहे. म्हणून निर्मला नानासाहेब गुंड या शेतकरी महिलेने मंत्रालयाच्या समोर आमरण उपोषण न्याय मिळालाच नाही तर आत्मदहन करण्याचे ठरवले आहे व त्याचे सर्व परिणामाची जबाबदारी ही संबंधित शासकीय अधिकारी,कर्मचारी,पोलीस प्रशासन व गावगुंड बांधकरी रवींद्र ज्ञानदेव गुंड व राजेंद्र ज्ञानदेव गुंड व इतर बाधकरीयांची जबाबदारी राहील. अशी सदर महिलेची मागणी आहे असे शेतकरी निर्मला नानासाहेब गुंड यांनी सांगितले.