व्हेंचर स्टील परिवार बारामती यांच्या वतीने व्हेंचर स्टील प्रायव्हेट लिमिटेड बारामती येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी बारामतीच्या औधोगिक वसाहती मधील अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिरास उपस्थित राहून शिबिरास शुभेच्छा दिल्या तर रक्तदान शिबिरात 91 रक्तबाटल्या संकलित झाल्या तर येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती यांनी रक्त संकलन केलेयावेळी अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिराचे आयोजन व्हेंचर स्टील कंपनीचे डायरेक्टर बाबासाहेब शेंडे, पूनम बाळासाहेब शेंडे व श्रधांक शेंडे, वासंती कुलकर्णी यांनी केले होतेतर उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो म्हणून या कालावधीत ब्लड बँकेच्या विनंतीवरून रक्तदान शिबीर आयोजित केले जाते असे शिबिराचे आयोजक बाबासाहेब शेंडे यांनी मत व्यक्त केले.