दिनांक 9/ 5 /2023 रोजी फिर्यादी श्री मारुती मोतीलाल करांडे वय 30 वर्ष धंदा व्यवसाय राहणार आसंगी तालुका जत जिल्हा सांगली. यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की फिर्यादी यांच्या मालकीचा अशोक लेलँड 40 18 मालवाहतूक टेलर नंबर N L 01 A B 35 77 या टेलर मध्ये माऊली कृपा ट्रान्सपोर्ट मार्फत कल्याणी स्टील कंपनी गिणगीरा होस्पेट कर्नाटक येथून लोखंडी रॉड मुंढवा पुणे येथील भारत फोर्स कंपनीमध्ये घेऊन जाण्यासाठी सोलापूर पुणे हायवे वरून जात असताना भिगवन गावच्या पुढे बबीता ढाबा येथे रात्री 03.00 वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी थांबले असता जेवण वगैरे झाल्यानंतर गाडीमध्ये ड्रायव्हर फिर्यादी स्वतः झोपलेले असताना टेलरच्या दरवाजा उघडून तीन इसम ट्रेलरच्या केबिनमध्ये आले. बाकीचे तीन एसएम खाली उभा राहिले ड्रायव्हरला दमदाटी करून त्याचे चार हजार रुपये काढून घेतले व मोबाईल देखील काढून घेतला व ट्रेलर चालू करून तो बारामतीच्या दिशेने घेऊन निघाले. पुढे या सर्वांनी मिळून तो ट्रेलर कनेरी तालुका बारामती या गावाच्या दिशेने आणला तेथे आल्यानंतर ड्रायव्हरला गाडीतून खाली उतरून त्याला मोटरसायकलवर अज्ञात स्थळी घेऊन गेले व गाडी पालखी महामार्गाचे काम चालू असलेल्या ठिकाणाचे बाजूला उभी करून गाडीमध्ये असणारा 53 लाखाचा मुद्देमाल लोखंडी रॉड एकूण 112 हे दुसऱ्या ट्रक मध्ये लोड करून दुसरीकडे घेऊन जाऊन विकण्याचा त्यांचा हेतू होता.सदरचे फिर्यादी यांनी घडलेला प्रकार बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे येऊन सांगितला.घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांनी तात्काळ पोसई लेंडवे व पोलीस स्टेशनचे तपास पथक तात्काळ गाडीचा शोध घेणे कामी योग्य त्या सूचना देऊन रवाना केले. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असतानाच तालुका पोलिसांनी तत्परता दाखवून मुद्देमाला सहित ट्रेलर व तेथे जागेवर दोन दरोडेखोर यांना पकडले तसेच त्यांच्याकडून इतर त्यांच्या साथीदारांची माहिती घेऊन तेथेच आजूबाजूला असणारे बाकीचे त्यांचे साथीदार यांना झाडे झुडपातून उसाच्या रानातून पाठलाग करून मोठ्या सीतापीने एकूण सहा दरोडेखोरांना अटक करण्यात आली.
Home क्राईम डायरी बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोराना गुन्हा दाखल होतातच दोन तासात 53,00,000 रुपये सह गुन्हेगार अटक करण्यात आली…