दिनांक -15 ऑगस्ट 2023
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे या महाराष्ट्र सरकारच्या स्वायत्त संस्थेद्वारा कुणबी मराठा समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती ग्रामपंचायत स्तरावर *चावडी वाचन* करून महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम संशोधक विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट च्या निमित्ताने केले आहे. यामध्ये २१०० पेक्षा जास्त संशोधक विद्यार्थ्यांनी मा. व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिलेल्या निर्दशाप्रमाणे सारथी संस्थेची माहिती तळागळातील लोकांपर्यंत पोहचवून सारथीचा प्रसार व प्रचार करून आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. सारथी कडून कुणबी व मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या उन्नतीसाठी राबविल्या जाणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत देण्याचे काम यानिमित्ताने करण्यात आले. सारथी संस्थेकडून महाराष्ट्रातील ग्रामपंचायत स्तरावर *चावडी वाचन* करून उपक्रमांची माहिती ग्राम स्तरावर पोहोचवण्याचे नियोजन 15 ऑगस्ट निमित्त होणाऱ्या ग्रामसभेच्या अनुषंगाने केले गेले. यासाठी महाराष्ट्रभरामध्ये *मी सारथीचा लाभार्थी* या कर्तव्य भावनेतून संस्थेचा लाभ घेणारे शेकडो विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल मराठा समाजातील विद्यार्थी, स्थानिक समाजातील लोक, महिलावर्ग, शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या उपक्रमातून झाले. योजनांची माहिती वाचन करणे व त्याचबरोबर ग्रामसभेत उपस्थित असलेल्या सदस्याचा अभिप्राय सदर विद्यार्थ्यांनी नोंदवून हे अभियान यशस्वी केले. आपला कार्य अहवाल व चावडी वाचनाचे फोटो सारथी कडे सादर केले जाणार आहेत. या सर्व उपक्रमामुळे महाराष्ट्रभरात सारथी संस्थेचा प्रचार प्रसार झाला व संस्थेच्या उपक्रमांची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहचली. सारथी संस्थेची वाटचाल अतिशय गतीने होत असून अश्या नावीन्य पूर्ण उपक्रमामुळे सर्व स्तरांमध्ये सारथी आपला नावलौकिक निर्माण करत आहे. बारामती तालुक्यातील गुणवडी या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये व जिल्हा परिषद शाळेत संशोधक विद्यार्थी श्री.अंबादास मेव्हनकर व श्री. ऋतुराज शेटे यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री एच.डी.पौंदकुळे, तलाठी श्री. गजानन पारवे, माजी सरपंच श्री. सतपाल गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अश्याच पद्धतीने महाराष्ट्र भर विविध ग्रामसभेत सारथी संस्थेतील उपक्रमांची माहिती स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वाचून दाखवण्यात आली व उपक्रम यशस्वी झाला.- आंबादास मेव्हणकर व ऋतुराज शेटे सारथी संशोधक विद्यार्थी, पुणे महाराष्ट्र.सं.क्र. 7821814384