Home क्राईम डायरी दारू पिऊन मुलगा त्रास देतो म्हणून ” आईनेच दिली पोटच्या मुलाला जीवे मारण्याची सुपारी..!!

दारू पिऊन मुलगा त्रास देतो म्हणून ” आईनेच दिली पोटच्या मुलाला जीवे मारण्याची सुपारी..!!

0
दारू पिऊन मुलगा त्रास देतो म्हणून ” आईनेच दिली पोटच्या मुलाला जीवे मारण्याची सुपारी..!!

मुलाला जीवे मारण्यासाठी आरोपीला १ लाख ७५ हजार रुपये दिल्याचे पोलिसांच्या चौकशीतून उघड.

तालुका पोलीस स्टेशन गु र ३१० / २०२३ भा. द. वि. कलम ३०२, २०१ अन्वये दि. २६ / ५ / २०२३ रोजी अनोळखी इसम वय अंदाजे ३० ते ४० वर्षे याचा निघुर्ण खुन करुन पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने त्याचे मयत शरीरावर रस्सी व तारेने मोठे दगड बांधुन त्यास शिर्सुफळ ता बारामती जि पुणे येथील पाण्याचे तलावामध्ये फेकुन दिले होते. यावरुन सदरचा गुन्हा दाखल झालेला होता. गुन्हा दाखल झालेल्या दिवसापासुन बारामती तालुका पोलीस स्टेशन तपास पथक हे आजुबाजुचे गावामध्ये गुन्हयाची उकल होण्यासाठी अथक प्रयत्न करुन कसोशीने तपास करीत असताना मा.पोलीस निरीक्षक श्री. प्रभाकर मोरे बारामती तालुका पोलीस स्टेशन यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे रावणगाव ता दौंड जि पुणे येथील पोपट भानुदास बाराते, त्यांची पत्नी मुक्ताबाई पोपट बाराते व मुलगा सौरभ पोपट बाराते हे गावातुन गेले ३ महीन्यापुर्वी अचानक गायब झाले होते. त्यानंतर १५ दिवसांनी पोपट बाराते व त्यांची पत्नी मुक्ताबाई बाराते हे रावणगावामध्ये त्यांचे राहते घरी आले परंतु त्यांचा मुलगा सौरभ हा त्यांचे सोबत आलेला नव्हता.त्यानंतर अद्याप पर्यंत मुलगा सौरभ हा गावामध्ये आलेला नाही. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने दि ३१/८/२०२३ रोजी पोलिसांनी पोपट बाराते याचेकडे त्याचा मुलगा सौरभ व पत्नी मुक्ताबाई यांचे ठावठिकाण्याबाबत विचारपुस केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व मला काही माहीत नाही माझे पत्नीला विचारा असे सांगीतलेने.पोलिसांनी त्यांचे पत्नीबाबत विचारपुस केली असता ती मुलगी निलम खुरंगे रा खुरंगेवाडी ता कर्जत जि. अहमदनगर हीचेकडे गेली आहे. असे सांगीतले त्यावेळी मुक्ताबाई बाराते हिचा शोध घेणेकामी मा.आनंद भोईटे सो.अपर पोलीस अधिक्षक बारामती यांचे परवानगीने आम्ही स्वतः व तपास पथक असे मौजे खुरंगेवाडी ता कर्जत जि अहमदनगर येथे जावुन बाई नामे मुक्ताबाई पोपट बाराते हीचेकडे सखोल चौकशी केली असता तिने सांगीतले की, माझा मुलगा सौरभ पोपट बाराते हा मला दारु पिवुन मला मारहाण मारहाण करायचा व माझे पती पोपट यांना त्रास देत होता म्हणुन मी आमचे गावातील १) बबलु तानाजी पवार रा रावणगाव ता दौंड जि पुणे यास मुलगा सौरभ पोपट बाराते यास जिवे ठार मारण्यासाठी १ लाख ७५ हजार रुपयेची सुपारी दिली होती. त्यानुसार बबलु पवार याने त्याचे मित्र १) बाबासाहेब (भाऊ) गजानन गाढवे. २) अक्षय चंद्रकांत पाडळे, असे मिळुन तिघांनी मुलगा सौरभ यास जिवे ठार मारुन त्याची मयत बॉडी शिर्सुफळ येथील तलावमध्ये दगड बांधुन टाकुन दिली आहे. तरी गुन्हयातील आरोपींना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली आहे. हि कामगिरी मा श्री अंकीत गोयल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण, मा. श्री आनंद भोईटे, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग बारामती, मा. श्री. गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग. यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, सहाय्यक फौजदार कल्याण शिंगाडे, पोलीस हवालदार राम कानगुडे, पोलीस हवालदार सुरेश दडस, पोलीस हवालदार गोदेश्वर पवार, सदाशिव बंडगर, संतोष मारकड, दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, महेश कळसाईत यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here